‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी

99

प्रबोध माणगांवकर : ‘बडे बाप कि बिगडी हुई औलाद’ ते दहशतवादी म्हणुन व्यक्तीमत्वावर झालेली चिखलफेक यासह आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गुपीतं दिलखुलासपणे कथन करणाऱ्या संजुबाबा अर्थात संजय सुनिल दत्त या सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहानी म्हणजे राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजु’ हा चित्रपट.

चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत अर्थात संजय दत्तची भुमिका साकारणरा रणबीर कपुर यासह चित्रपटातून अभिनेत्री सोनम कपूर, अनुष्का शर्मा, मनिषा कोइराला संजय दत्तच्या आईच्या (नरगीस) तर, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे संजय दत्तच्या वडिलांच्या अर्थात दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या भूमिकेत आपल्याला झळकताना दिसत आहेत.

खरा संजय दत्त हा दहशतवादी नव्हता, मग संजू नेमका कसा होता, त्याच्या आयुष्यात नेमके कोणते असे प्रसंग आले ज्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला यांसारख्या अनेक घटणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न ‘संजु’मध्ये झाला आहे.

संजय दत्त च्या आयुष्यातील आपल्या आईचे स्थान (नरगिस) , वडिलांसोबतची मैत्री, अगणित गर्लफेन्ड्स, हक्काची पत्नी इथपासुन धुम्रपान, करियरमधील चढऊतार, दहशतवादाशी संबंध , जेल मधील किर्रर्र शांतता या सर्व गोष्टी नेमकेपणाने चित्रपटात मांडण्यात आलेल्या आहेत. रणबीरचा अभिनय कडक आहे.. पाश्वसंगीत , गाणी आणि कथानकातील दमदारपणा प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा आहे. त्यामुळे नक्की पाहा ‘संजु’ अर्थात व्यक्ती एक रुपं अनेक..

SHARE
Previous articleइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय
Next articleशंभरची नोट पडली इतक्या कोटींना
Webmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.