इंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय

84

दिनेश शिंदे : डब्लिन- बॅट्समन नंतर इंडियाच्या कुलदीप, यजुवेंद्र ने कमाल केली. इंडियाच्या मजबूत बॉलिंग लाईन अप समोर आयर्लंड 132/9 रन बनवू शकली आणि आयर्लंडचा 76 रननी पराभव झाला.

कुलदीप ने 4 व यजुवेंद्र चहल ने 3 विकेट घेतले. 209 रनच्या पाठलाग करताना आयर्लंडकडून जेम्स शेनॉन ने 60 रनची खेळी केली.

आयर्लंड ने इंडिया विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय इंडियाच्या रोहित शर्मा (97 रन), शिखर धवन (74 रन) ने चुकीचा ठरवला. दोघांनी आयर्लंडच्या बॉलर्सची धुलाई सुरू केली. रोहित-शिखर ने पहिल्या विकेटसाठी 160 रनची पार्टनरशीप केली. ही पार्टनरशीप तुटल्यानंतर आयर्लंडच्या बॉलर्सनी कमबॅक केले. पीटर चेस ने एका मागोमाग 4 विकेट्स घेतले.

पीटर चेसने शेवटची ओवर खूप चांगली केली, पीटर घेतलेल्या 4 विकेटमधील 3 विकेट हे शेवटच्या ओवरमधील होते.पीटर चेसच्या शेवटच्या बॉलवर हार्दिक पांड्या ने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने 6 मारला आणि इंडियाने 20 ओवरमध्ये 208/5 चा स्कोर केला.

पीटर चेस व्यतिरिक्त केविन ओब्रायन ने 1 विकेट घेतली.