पंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?

68

मुंबई : पीएमबी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदीच्या कायदेशीर प्रत्यार्पणाला सुरुवात झाली. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मुंबईतील पीएमएलए कोर्टाने मंजुरी दिली असून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचलनालयाने पीएमएलए कोर्टात अर्ज केला होता. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी यामधून मागण्यात आली होती. या अर्जाला कोर्टानं मंजुरी दिल्याने नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग काही प्रमाणात सुकर होणार आहे.

दरम्यान, याआधीच नीरव मोदी याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयने सर्व इंटरपोल देशांशी संपर्क साधला आहे. तसेच अमेरिका, फान्स, सिंगापूर, ब्रिसेल्स, सौदी अरेबिया आणि ब्रिटन या सहा देशांशी पत्राद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, अद्याप केवळ ब्रिटननेच सीबीआयच्या या पत्राला उत्तर दिले आहे. त्याचबरोबर नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती इंटरपोलच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये 24 फेब्रुवारी रोजीच समाविष्ट करण्यात आल्याचेही सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.