सपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर

68

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरी हिने भाजप खासदाराच्या विधानावर सडेतोड प्रत्युत्तर दिले. माणूस ज्याप्रमाणे विचार करतो, तसे बोलतो. त्यामुळे खासदार चोप्रा यांच्या नजरेत आपण ठुमकेवालीच असल्याची खोचक टिप्पणी चौधरी हिने केली आहे.

भाजप खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांनी सपना चौधरी हिचा ठुमकेवाली असा उल्लेख केला होता. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते.सपना चौधरी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चौधरी यांचा तोल ढासळला. काँग्रेसला निवडणूक लढविण्यापेक्षा ठुमक्यांमध्येच जास्त रस असल्याची टीका चोप्रा यांनी केली होती.