४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा

54

वेब महाराष्ट्र टीम : रविवार रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाची संततधार पुढील चार दिवस अशीच राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण तसेच उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारताच्या अनेक भागात मान्सून दाखल झाला आहे. ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडच्या भागात काही प्रमाणात मान्सून दाखल झाला आहे. रविवारी कोकण, गोवा, मुंबई तसेच उपनगरात चांगल्या पावसाची नोंद झाली तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस झाला.

२६ जून रोजी गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण-गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. २८ आणि २९ जूनला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.