अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

50

वेब महाराष्ट्र टीम : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट हिंदुस्थानी हॉकीपटू तपन दास यांच्या जीवनावर आधारित आहे. तपन दास यांनी हिंदुस्थानला १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक येथे हॉकी या खेळासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. अक्षय कुमार या चित्रपटात तपन दास यांची भूमिका साकारणार आहे.

‘गोल्ड’ या चित्रपटात अक्षय कुमारसह मौनी रॉय, सनी कौशल, कुनाल कहूर आणि अमित साध हे अन्य कलाकार आहेत. मौनी रॉय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तर विनीत कुमार याआधी ‘मुक्केबाज’ चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.