पावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान

71

वेब महाराष्ट्र टीम : अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ जमिनीचा मोठा भाग खचला. या घटनेत जवळपास १५ कार दबल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील बांधकामाविषयी स्थानिकांनी तक्रारी करूनही पालिकेने आजवर डोळेझाक केली आहे.

लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ‘दोस्ती एकर्स’ ला बीएमसी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेमुळे शेजारच्या इमारतीनांही यामुळे धोका निर्माण झाला. या परिसरात अनेक टोलेजंग इमारती असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. अशा प्रकारांवर कारवाई न झाल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची चिंता स्थानिकांना भेडसावत आहे. 

जरी पाऊस थोडा थांबला असला तरी पाणी साचण्याचे प्रमाण परिसरात कमी झालेले नाही. दीड महिन्यापूर्वी स्थानिकांनी पालिकेत तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आले नसल्याचे स्थानिकांचे  म्हणणे आहे.