पाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण

141

अहमदनगर :  पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी परिसरात जमावाने महिला बसवाहक आणि चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. आशा बळे आणि रोहिदास पालवे ही मारहाण करण्यात वाहक आणि चालकांची नावे आहेत.

शनिवारी राजेंद्र आठरे आणि चालक पालवे यांच्यात एकमेकांच्या वाहनांना साईट देण्यावरुन शाब्दिक वाद झाला. त्याचा राग मनात धरून आठरेंसह दहा जणांनी पाठलाग करुन बस अडविली. जमावाने चालकाला खाली ओढून दांडके आणि कु्ऱहाडीच्या सहाय्याने  बेदम मारहाण केली.त्यावेळी जमावाने वाहकाकडे असलेले सहा हजार आठशे रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या पालवे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
SHARE
Previous articleसई मागणार रेशमची माफी …
Next articleपावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान
Webmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.