आर. प्रज्ञानंद ठरला जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर

79

वेब महाराष्ट्र टीम : इटली येथे झालेल्या ग्रेन्डिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईच्या १२ वर्षे, १० महिने आणि १३ दिवसांच्या प्रग्नानंधाने अंतिम फेरीपूर्वीच ग्रँडमास्टरचा तिसरा नॉर्म पूर्ण केला. यामुळे आता बुद्धिबळपटू आर. प्रग्नानंधा हा भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा ‘ग्रँडमास्टर’ ठरला.

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रग्नानंधाला पराभचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतरच्या पुढील आठ फेऱ्यांमधील त्याने ५ फेऱ्यांमध्ये विजय मिळवला तर ३ फेऱ्या बरोबरीत सोडवल्या. तसेच अंतिम फेरीत प्रग्नानंधाला ‘प्रतिस्पर्ध्यांचे सरासरी रेटिंग’ हा निकष पूर्ण होण्याच्या दृष्टीने २४८२ च्या वरील रेटिंग असलेला प्रतिस्पर्धी हवा होता. तो मिळाल्याने अंतिम फेरीपूर्वीच प्रग्नानंधाचा तिसरा ऐतिहासिक नॉर्म पूर्ण झाला.
अंतिम फेरीमध्ये त्याने काळ्या मोहऱ्यांसोबत खेळताना नेदरलँड्सच्या पी. रोएलरवर विजय मिळवला.  या स्पर्धेत प्रग्नानंधाने ७.५  गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर क्रोएशियाच्या सॅरिक इव्हॅनने विजेतेपद मिळवले. प्रग्नानंधाच्या या कामगिरीमुळे प्रभावित होऊन भारताचा बुद्धिपळपटू विश्वनाथन आनंदने त्याचे अभिनंदन केले. ग्रँडमास्टर क्लबमध्ये तुझे स्वागत आणि अभिनंदन. लवकरच चेन्नईत भेटू,’ असे ट्विट आनंदने केले