VIDEO : प्लास्टिक बंदीबद्दल तुमचा काय अनुभव, नक्की पाहा हे भन्नाट व्हिडीओ

195

वेब महाराष्ट्र टीम : आजपासून महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अनेकांना दंड भरावा लागला असल्याच्या पावत्या सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असं असलं तरी दररोजच्या वापरात येणारं प्लास्टिकच आता हद्दपार झालं तर त्याला पर्याय काय असे एक ना अनेक प्रश्न सध्या आपल्याला पडले आहेत. मात्र पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने प्लास्टिक बंदी करणं अत्यंत गरजेचे होते.

प्लास्टिक बंदी झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळे अनुभव येतील, त्यांना कसं आपापल्यापरीने हाताळायचं हे या व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सुमीत पाटील यांनी केला आहे. कॅरी ऑन या नावाने तयार करण्यात आलेले हे भन्नाट व्हिडीओ नक्की पाहा, आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :