‘व्हिडिओ गेम अॅडिक्शन’ मानला जाणार मानसिक आजार

254

वेब महाराष्ट्र टीम : सतत व्हिडिओ गेम खेळून त्यांच्यात खेळायची आवड निर्माण होते. नकळत ही आवड सवयीमध्ये बदलते अशा मुलांना ‘व्हिडिओ गेम अॅडिक्ट’ म्हटले जाते. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूटीओ) व्हिडिओ गेम अॅडिक्शनला आजपासून मानसिक आजाराचा दर्जा दिला आहे. डब्ल्यूटीओच्या या निर्णयामुळे व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. आयसीडी म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्थरावर रोगांचे केलेल्या वर्गीकरणाच्या यादीत आता व्हिडिओ गेम अॅडिक्शन हा एक मानसिक आजार म्हणून गृहित धरण्यात आला.

डब्ल्यूटीओने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगात २.६ अब्ज लोक नियमित व्हिडिओ गेम खेळतात. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. याचा फायदा गेमिंग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर होतो. गेमिंग इंडस्ट्रीचा नफा दरवर्षी ३१% ने वाढत आहे. मुलांना गेमिंग अॅडिक्शन पासून दूर करण्यासाठी ब्रिटेन येथील मुलांना मोफत उपचार दिले जातात. येथील मुलांना मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन गेम खेळण्याची सवय असल्याने बाहेरील खेळ खेळण्यावर जास्त भर दिला जात आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या… 

दरम्यान, तुम्हालाही मोबाईल गेम्स घेळण्याची सवय असेल तर, वेळीच सावध व्हा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या…