सगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का ?

120

वेब महाराष्ट्र टीम : आज 1 जून रोजी अनेकांचे वाढदिवस आहेत. नीट लक्ष दिलं तर तुमच्या आजोबांची पिढी, वडिलांची पिढी आणि आजूबाजूचे, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला असतोच. आज जर तुम्ही फेसबुकवर वरची फ्रेण्डलिस्ट चेक केली तर त्यातही कितीतरी जणांचे आज वाढदिवस आहेत पण अनेकांचा विशेषत: जुन्या पिढीतील लोकांचा 1 जून हा जन्मदिवस का आहे, याचे कारण आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे कारण : पूर्वी अनेकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती, त्यावेळेस जन्मतारीख नोंदवली जात नव्हती. इतकंच काय पण शाळेत नाव नोंदवताना जन्मतारखेची फारशी आवश्यकता नव्हती; मात्र शाळेत घालण्यासाठी वयाची अट पूर्ण करावी लागायची. मग ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे. त्यामुळे सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते.