वरीष्ठ वकील ते न्यायाधीश : इंदू मल्होत्रा

75

नवी दिल्ली : वरीष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेती.

देशात सध्या सुरू असलेले महिला अत्याचाराने थैमान आणि त्यामुळे संपूर्ण वातावरणचं ढवळून निघालं आहे; पण इंदू मल्होत्रा यांच्या या कामगिरीची महिलांसाठी ही एक सकारात्मक बाब आहे. या पदावर नियुक्ती करण्यासाठी इंदू मल्होत्रा यांची फाईल तपासणीसाठी इंटेलिजन्स ब्युरोला सोपवली होती. एखाद्या व्यक्तीची घटनात्मक पदासाठी नेमणूक करण्यापूर्वी, इंटेलिजन्स ब्युरोद्वारा त्यांची व्यावसायिक क्षमता आणि वैयक्तिक एकात्मता तपासली जाते. या व्यतिरिक्त, आयईबीही त्यांच्या विरोधात आरोपांची चौकशी आणि सत्यता तापासून सरकारला अहवाल देते.

संपूर्ण तपासणीनंतर, आयईबीकडून इंदू मल्होत्रा यांची फाईल कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आणि नंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालयानेदेखील या पदावर शिक्कामोर्तब केला आहे.