प्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा

3492
वर्धा / अक्षय अहिव  :  लग्नाचा मंडप सजलेला… सजलेला नवरदेव मंडपात तयार… लग्न लागण्यास काही वेळेचीच घटीका राहिलेली… सर्वत्र आनंदाच वातावरण… अक्षता पडण्याच्या काही वेळापूर्वी नवरी मुलीनं प्रियकरासोबत पलायन केलं आणि रंगाचा बेरंग झाला… पण, तीन महिन्यांपूर्वी बघितलेल्या एका मुलीनं लग्नास होकार दिला आणि वेळेवरच लग्नसोहळा पार पडला.. सिनेमात शोभून दिसावी अशी घटना वर्धा जिल्ह्याच्या आर्वीत घडलीय.
ही गोष्ट चित्रपटात पाहायला नवल वाटणार नाही.. पण खऱ्या आयुष्यात असा प्रसंग घडताना आनंदी वातावरण दुःखात कसं बदलतय याचा अनुभव कळसकर परिवाराला आलाय. यावेळी ‘ज्योतीचा’ होकार कळसकर कुटुंबियांच्या दु:खाला प्रकाशात परावर्तीत करणारा ठरला. आर्वीतील नवरदेव गजानन कळसकर याचं लग्न यवतमाळातील एका मुलीसोबत ठरलं.
ठरल्याप्रमाण लग्नाची तयारी झाली. नवरीही लग्नस्थळी पोहोचली. पण, लग्न लागण्यास काही वेळ असताना नवरीनं प्रियकरासोबत पलायन केलं. तिचा शोध घेऊनही थांगपत्ता न लागल्यानं दोन्ही कुटुंबिय हतबल झाले. लग्न घरी रंगाचा बेरंग झाला. यावेळी मुलीला दुसऱ्याने फूस लावून पळवून नेल्याचा मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं. पण, तोवर वेळ निघून गेली होती. अखेर मुलाच्या कुटुंबियांनी तीन महिन्यांपूर्वी पाहिलेल्या मुलीकडच्या निकटवर्तीयांशी संपर्क केला.
अचानक झालेल्या आघातात हा निर्णय घेत थोडा संयम पाळण्यात आला. काही महिन्यांपूर्वी बघितलेल्या ज्योतीनेही या लग्नास होकार दर्शविला. बुलढाण्यापासुनचं अंतर पूर्ण करत सात तासांनी लग्न मंडपात ज्योती म्हजणेच नवीन नवरी पोहोचल्याचं कळताच लग्नस्थळी जल्लोष करण्यात आला. रात्री ज्योती आणि गजाननचा विवाह उरकण्यात आला. एखादं लग्न तुटल्यानंतर मुलासोबतच मुलीकडच्या कुटुंबियांना अधिक त्रास होतो. येथे तर मुलगी पळून गेल्यानं अवघ्या लग्नसोहळ्यावरच विरजण पडलं. पण, लग्नाच्यागाठी पूर्वीच बांधून असतात, या म्हणीचा परिचय येत काही महिन्यांपूर्वी पाहिलेल्या मुलीसोबतच मुलाचं लग्न झालं.