जर्मनीमधून दिला दहावीचा पेपर

3252

पालकांनी ‘आयसीएसई’ बोर्ड आणि संबंधित यंत्रणाशी याबाबत संपर्क साधला. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या दोघींनी थेट जर्मनीतून त्यांचा दहावीचा पेपर दिला. भारतीय क्रीडापटूने परदेशातून दहावीची परीक्षा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. नागपुरची रितिका ठक्कर आणि मुंबईची सिमरन सिंघी या बॅडमिंटनपटूंनी देशांर्तगत स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. त्यांच्या पालकांकडूनही वेळोवेळी मुलींच्या खेळातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. मात्र जर्मन कनिष्ठ खुली बॅडमिंटन स्पर्धा आणि ‘आयसीएसई’चा बोर्डाचा दहावीचा इंग्रजीचा पेपर एकाच वेळी आल्याने रितिका व सिमिरनचे कुटुंबिय संभ्रमात अडकले होते. मात्र या सगळ्या अडथळ्यांना पार करत, त्या दोघींनी जर्मनीतील बर्लिन येथून दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला.भारतीय दुतावासाच्या कार्यालयात बसून, सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांनी पेपर सोडविला. रितिका व सिमरनचे आव्हान स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले असले, तरी दुसरीकडे दहावीची परीक्षा दिल्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे.

SHARE
Previous articleपान क्र.०३ “विळखा”
Next articleट्रिपल सीट आली अनेकांच्या अंगाशी
Webmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.